मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू करण्यात आलेय. 

Updated: Oct 14, 2018, 08:34 PM IST
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू  title=

नाशिक : नाशिक शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या आणि शहरात निवाऱ्याची सुविधा नसणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह सुरू करण्यात आलेय. या वस्तीगृहाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्र्कांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विनायकराव मेटे उपस्थतित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेतंर्गत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी हे वसतिगृह सुरू करण्यात आलेय.

सव्वाशे मुलांची व्यवस्था

 या वसतीगृहात सव्वाशे मुलांची व्यवस्था केली असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.

अद्यावयत सेवा पुरविली जाणार आहे. आणि लवकरच मुलींसाठी देखील वसतिगृह सुरू केली जाणार असल्याची माहिती महाजन यांनी दिलीयं. 

दिंडोरी रोडवरील जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथील दोन इमारती या वसतीगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत करण्यात आल्याय आणि त्यानुसार मराठा समाजाला वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आलेयं.