प्रवण पोळेकर / रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला (Ratnagiri Barsu Refinery Project ) स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. बारसूत रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. बारसूत सर्वेक्षण सुरु असून दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांची आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण करु दिले जाणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांची आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात रिफायनरीचे सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांनी विरोध केला असून आंदोलन सुरु केले आहे. यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करणाऱ्या आंदोलकांना रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.
Barsu Refinery : बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक
बारसू येथे दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सड्यावर जमा झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, यावर ग्रामस्थ ठाम आहेत. सकाळचा नाश्ता सह दुपारच्या जेवणाची सोय करत ग्रामस्थ साड्यावर दाखल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण करु दिले जाणार नाही, अशी ग्रामस्थांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना विरोध केला तर आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान, पोलिसांनी काल काही नागरिकांना घरी पाठवले होते. मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडलेली नाही. काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला.
काल राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी जवळपास दीड ते दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. आज महिलांनी झोपून रस्ता अडवला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या स्थितीत नाही.