पाचगणी महोत्सवात स्ट्रॉबेरीचा आनंद

पाचगणी हिलस्टेशनची महती सातासमुद्रापार जावी, या ठिकाणी पर्यटक आकर्षिले जावेत यासाठी 'पाचगणी महोत्सवा'चे आयोजन

Updated: Dec 3, 2017, 02:18 PM IST
 पाचगणी महोत्सवात स्ट्रॉबेरीचा आनंद  title=

पाचगणी : लालचुटुक व आंबट गोड, स्ट्रॅाबेरीचा आनंद,थंड हवेचे हिलस्टेशन, टेबल लॅन्ड, घोडयावरुन रपेट, मोटर बाइक राइट, साकलिंग, निसर्गांचे सानिध्य, काटिंग  यासारखा आनंद पर्यटकाना आनंद फक्त पाचगणीतच मिळु शकतो.

पाचगणी महोत्सव

पाचगणी हिलस्टेशनची महती सातासमुद्रापार जावी, या ठिकाणी पर्यटक आकर्षिले जावेत यासाठी 'पाचगणी महोत्सवा'चे आयोजन केल्याचे पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांनी सांगितले. 

यावेळी पाचगणी येथील सर्व शाळेतील विदयार्थ्यानी सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रम केला. 

पर्यटकांचे स्वागत 

ढोल ताशांच्या गजरात पारंपारीक पध्दतीने पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. पाचगणी महोत्सवाचे उद्घाटन पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, तहसीलदार रमेश शेडगे, यांच्याहस्ते करण्यात आले.

८ हजार लोकसंख्या

३ दिवस सुरु असलेल्या पाचगणी महोत्सवात सायकल रेस, रोड रेस फनी गेम्स या सारख्या स्पर्धा पार पडल्या  ८  हजार लोकसंख्या व शाळेतील २० हजार विदयार्थी पाचगणी शहरात वास्तव्यास आहेत.

८ लाख पर्यटक

विदयेचे माहेरघर म्हणुन जगाच्या नकाशावर पाचगणी आहे वर्षभरात ८ लाख पर्यटक भेट देतात या पाचगणी महोत्सवामुळे पाचगणीची महती वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे