maharashtra winter session 2023 : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. मंडपात एकत्र येत बॅनरबाजी करत दारुड्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची चर्चा रंगली होती.. या दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या जाणून घेवूयात.
दारुडा शब्दावर बंदी आणा, मद्यप्रिय शब्द वापरा. मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा. मद्यपींच्या मुलांना मोफत शिक्षण द्या. मद्यविक्रीतून येणा-या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करा. मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा. 31 डिसेंबरला 'मद्यप्रिय दिवस' घोषित करा. मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका. बारमध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा. मद्यपींचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा. गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा अशा विविध मागण्यांसाठी मद्यपींनी हे आंदोलन केले.
कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मद्यपींनी हे आंदोलन केलं.. विशेष म्हणजे कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांनीही या आंदोलनाची दखल घेतली.. कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या आंदोलनाची चर्चा आहे.. त्यामुळे आता मद्यपींच्या मागण्यांचं काय होतं याकडे लक्ष लागलंय.
शासकीय कामाच्या वेळेत दारूच्या नशेतला अधिकारी चक्क कार्यालयातल्या कक्षातच लोळला. अमरावतीतल्या तिवसा इथले अजय सोनटक्के हे उपकोषागार अधिकारी मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात बेशिस्त वर्तन करत असल्याचं नागरिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर या मद्यपी अधिकाऱ्याला पोलिसांनी त्यांच्या कक्षाबाहेर काढलं. हा अधिकारी बरेचदा दारू ढोसून कार्यालय परिसरात धिंगाणा घालत असल्याची चर्चा असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
पुण्यात PMPMLबसचालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. दोन मद्यधुंद तरुणांची बसचालकाला मारहाण केलीय..वेल्हा तालुक्यातील आंबवणे इथं ही घटना घडलीय. बसचालकानं हॉर्न वाजवून कारचालकाला कार बाजुला घेण्यास सांगितलं.. मात्र, संतप्त दोन तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तेजस गायकवाड या बसचालकाला गंभीर दुखापत झालीय. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुण्यात PMPMLबसचालकांना सातत्यानं मारहाण होत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.