स्टेशनरी घोटाळाप्रकरणी स्थायीची 3 सदस्यीय चौकशी समिती

 गेल्या पाच वर्षांतील सर्व व्यवहार तपासणार

Updated: Dec 23, 2021, 04:00 PM IST
स्टेशनरी घोटाळाप्रकरणी स्थायीची 3 सदस्यीय चौकशी समिती title=

नागपूर - महानगरपालिकेच्या  कर्मचारी व कंत्राटदारांच्या संगनमताने स्टेशनरीचे बोगस बिले काढून 67 लाखांचा रुपयांचा घोटाळा पुढे आला.त्यानंतर महापलिकेत एकच खळबळ उडाली. आता याप्रकरणी महानगरपालिका स्थायी समितीने  तीन सदस्य समिती गठित केली आहे. ही समिती नगरसेवक ऍड. संजय बालपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करेल.महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या  अतिरिक्त या अध्यक्षतेखालीही एक समिती अगोदरच नेमली होती.ती समिती एक वर्षाच्या व्यवहारांचा  तपास करणार आहे, तर स्थायी समितीने गठीत केलेली समिती पाच वर्षांच्या व्यवहारांचा तपास करणार आहे.

   महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्टेशनरी, प्रिंटिंग साहित्य पुरवठा न करताच कंत्राटदाराने 67 लाख रुपयांची उचल घेतली होती. पालिकेतील  हा घोटाळा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. कंत्राटदाराच्या कुटुंबातील दोन तसेच महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या घोटाळ्याला अनेक वर्षाची पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समितीनी स्थापित केलेली तीन सदस्यीय समिती ही गेल्या पाच वर्षाच्या व्यवहाराची तपासणी करणार आहे. याप्रकरणी मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    मोठ्या प्रमाणात इतर विभागांनाही होतो स्टेशनरी घोटाळा झाल्याचा संशय आहे.

कंत्राटदारांची बिले काढताना कर्मचाऱ्यांचा संगनमताने अधिकाऱ्याची यूजर आयडी व पासवर्ड वापरण्यात आले होते. सध्या फक्त आरोग्य विभागातील स्टेशनरी घोटाळा उघडकीस आला असून इतर विभागांना मोठ्या प्रमाणात स्टेशनरी पुरवठा होतो.त्यात अशाच प्रकारे घोटाळा घडल्याचा संशय आहे.