एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी तर राष्ट्रवादीला दे धक्का

 ST Employees News : आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघण्यास मंजुरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

Updated: Jul 22, 2022, 10:42 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी तर राष्ट्रवादीला दे धक्का title=

मुंबई : ST Employees News : आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघण्यास मंजुरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेला महामंडळाने धक्का दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह या बँकेत जमा होतो. या बँकेवर राष्ट्रवादीच्या संघटनेची सत्ता आहे. बँकेत एसटी महामंडळाच्या 80 टक्के कर्मचाऱ्यांचे खाते आहे. या निर्णयामुळे बँकेकडून या कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या कथित आर्थिक शोषणाला चाप बसणार असल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांनी अनेकदा एसटी बँक वगळून, अन्य राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी देण्यात आलेली नव्हती. सत्ताबदल झाल्यानंतर एसटी महामंडळाने आता त्यांना परवानगी दिली आहे. हा निर्णय एसटी बँकेआड होणाऱ्या राजकारणाला आळा घालणारा आहे.  महामंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी बँक हातात असणे गरजेचे आहे. कामगार संघटना आपले सदस्य वाढवण्यासाठी या बँकेचा वापर करतात. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवरील दबाव कमी होणार आहे, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे वेतन खाते इतर बँकांमध्ये उघडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक या एसटी महामंडळाच्या बँकेत 80 टक्के एसटी कर्मचाऱ्यांचे खाते आहे. महामंडळाकडून मिळणारे वेतन आणि अन्य आर्थिक लाभ थेट या खात्यात जमा होतात. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.