'महाराष्ट्र बंद'च्या दिवशी एसटीचं २० कोटींचं नुकसान

एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय... मात्र, हे नुकसान आंदोलनकर्त्यांकडून वसूल केलं जाणार नाही. 

Updated: Jan 5, 2018, 11:21 AM IST
'महाराष्ट्र बंद'च्या दिवशी एसटीचं २० कोटींचं नुकसान  title=

मुंबई : एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय... मात्र, हे नुकसान आंदोलनकर्त्यांकडून वसूल केलं जाणार नाही. 

आर्थिक नुकसान झालं असलं तरी आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय.

तसंच या काळात एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचे जे अतोनात हाल झाले त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.