कोल्हापुरात ५० जणांना अटक, २००० जणांविरोधात गुन्हे दाखल

बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या २००० हून अधिक जनाच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Jan 5, 2018, 10:49 AM IST
कोल्हापुरात ५० जणांना अटक, २००० जणांविरोधात गुन्हे दाखल  title=

कोल्हापूर : बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या २००० हून अधिक जनाच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आत्तापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही दंगलखोर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. 

पोलीस गुन्हे दाखल करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहे. दंगल माजवणे आणि जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याची कलमं पोलिसांकडून लावली जात आहेत.

गुन्हे दाखल झालेल्यामधे आंबेडकरवादी संघटनासह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याचा समावेश आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडीमध्ये अजुनही तनाव आहे. पण पोलिसांनी रुकडीमधे संचारबंदी लागू केल्यानं तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे.