मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.ला बसला आहे. २० ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ३५३ एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यापैकी सर्वाधिक १३६ बसेस एकट्या सोलापूर जिल्ह्यात फोडण्यात आल्यात. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे एसटीचे १ कोटी ४५ लाख इतके नुकसान झाले. तर आंदोलनामुळे रद्द कराव्या लागलेल्या फेऱ्यांमुळे २२ कोटी २ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.