St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे एसटीबस, कार आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे हा अपघात घडला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. 

Updated: Jan 10, 2023, 08:02 PM IST
St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... या म्हणीला तंतोतंत खरं ठरवणारी घटना पुण्यात(Pune) घडली आहे.  थेऊरफाटा येथे एस टी बस, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला(St Bus Accident). समोर मृत्यू दिसत होता. पण,  ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. मात्र, यात एकण जखमी झाला आहे. 

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे एसटीबस, कार आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे हा अपघात घडला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मात्र, या अपघातात रस्तादुभाजकावर रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात आले आहे. 

अक्कलकोट ते ठाणे बसला हा अपघात झासा आहे.  ठाणे आगाराची ही बस (क्र. एमएच १४ बीटी २६९३) या मार्गावर दैनंदिन प्रवासी फेऱ्या मारते. नेहमीप्रमाणे आज ही एसटीबस अक्कलकोटहून 30 ते 40 प्रवाशांना घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून चालली होती. 

पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना, एसटीबस थेऊर फाट्याजवळ आली असता बसचा अचानक ब्रेक फेल झाला. बसने  कार आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कार आणि ट्रकचे नुकसान झाले आहे. या दोन वाहनांना धडक दिल्यांनतर बस रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन आदळली.

यावेळी दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हातावरून आणि पायावरून  बस गेल्याची माहिती मिळत आहे.  त्याला उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव व पत्ता अद्याप समजलेला नाही. मात्र, ड्रायव्हरने सतर्कता दाखवत बसवर नियंत्रण मिळवले. यामुळे 40 प्रवासी बचावले आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी व वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण वाचले. एस टी बस चालक पी.डी सावंत यांच्या बसचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला होता. त्यामुळे पुढील कार आणि ट्रकला एस टी बसने जोरदार धडक दिली. मात्र सावंत यांनी प्रसंगवधान दाखवून पुन्हा बसवर नियंत्रण मिळवून बस रस्त्याच्या एका बाजूला घेऊन थांबविली. त्यांमुळे दैव बलवत्तर असल्याने बसमधील 40 प्रवाशी यातून बचावले आहेत.