एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.

Updated: Jul 11, 2017, 11:31 AM IST
एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी title=

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.

एसटी प्लॅटफॉर्मवर सिमेंट खांब्यावर आदळली. त्यामुळे सुदैवाने संभाव्य हानी टळली. बसमधील ४६ प्रवाशांपैकी सहा प्रवाशांना किरकोळ मार लागला. जखमींना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, शाळा महाविद्द्यालय विद्यार्थ्यांची कमी गर्दी होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.