एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 5 जण ठार तर 15 प्रवासी जखमी

ST and Container Accident at Buldhana : बुलडाण्यात एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झालेयत तर 15 प्रवासी जखमी झालेत. हा अपघात पळसखेड चक्का गावाजवळ झाला.  

Updated: May 23, 2023, 08:11 AM IST
एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 5 जण ठार तर 15 प्रवासी जखमी title=

ST and Container Accident at Buldhana : बुलडाण्यात एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झालेयत तर 15 प्रवासी जखमी झालेत. कंटेनर आडवा आल्याने बस कंटेनरमध्ये घुसली. ही पुण्यावरून बस मेहकरला जात होती. त्यावेळी पळसखेड चक्का गावाजवळ अपघात झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

या अपघातात 15 जण जखमी

मुंबई - औरंगाबाद महामार्गावर कंटेनर आणि एसटीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जण ठार झालेत. एसटी औरंगाबादहून वाशिमकडे जात होती. या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

काहींची प्रकृती गंभीर

कंटेनर आणि एसटी अपघातानंतर मुंबई - औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात इतका भीषण होता की पाच लोक जागीच ठार झाले आहेत. 15 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एसटी वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6.15 वाजण्याच्या दरम्यान कंटेनर आणि एसटी जोरदार धडक झाली. या अपघातात एसटीचा चालक जागीच ठार झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच स्थानिक लोकांच्यामदतीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.