पुणे : बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या मुलांनाही निकालाचे वेध लागतात. बारावीचा निकाल यंदा ३१ मे रोजी लागला, आणि यानंतर दहावीचा निकाल कधी लागेल, याची उत्कंठा दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागून होती. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा बारावी आणि दहावीचा निकाल वेळेवर लागत आहे, हे दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर अखेर स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या अनेक तारखांच्या अफवा फिरत होत्या, मात्र अखेर दहावीच्या निकालाची तारीख ही ८ जून २०१८ सांगण्यात येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल १० जूनपर्यंत आणि बारावीचा निकाल ३१ मेपर्यंत लागेल, असं बोर्डाकडून याआधी सांगण्यात आलं होतं. या वेबसाईटवर पाहा निकाल www.mahresult.nic.in
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) to declare Maharashtra SSC Class 10 results tomorrow.
— ANI (@ANI) June 7, 2018
यावर्षी १७.५१ लाख विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. १ मार्च ते २४ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. मागच्यावर्षी ८९.५० टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाले होते. या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्याबद्दलची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर हा निकाल तुम्हाला पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या वापरासाठी डाऊनलोड केलेला या निकालाची प्रिंट काढावी लागणार आहे. त्याप्रमाणे बारावीचा निकाल ३० मे रोजी लागला. बारावीच्या निकालामध्ये ५.४८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले.