Mumbai Versova Beach Car Accident: वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोन जणांना एका कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षा चालक असलेल्या गणेश यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्याचा मित्री बबलु श्रीवास्तव हा जखमी झाला आहे. वर्सोवा समुद्र किनाऱ्याजवळच ही घटना घडली आहे. हिट अँड रनप्रकरणाने पुन्हा एकदा मुंबई हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुण हे वर्सोवा येथील स्थानिक असून कुटीर रहिवासी संघ येथील रहिवाशी होते. घरात गरम होत होतं म्हणून तिघ वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपण्यासाठी आले होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. वर्सोवा पोलिसांनी एसयुव्ही जप्त करुन चालक निखिल जावडे (34) आणि शुभम डोंगरेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून शुभम नागपूरचा तर शुभम ऐरोलीचा रहिवाशी आहे. दोघंही कॅब व्यवसायातील भागीदारी आहेत तर अंधेरी कोर्टाने दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी जप्त केलेली एसयुव्ही नागपुरच्या सतीश यांची होती. त्यांनी ती जावडे आणि डोंगरे यांना कंत्राटावर दिली होती. सोमवारी एका ग्राहकाला सोडल्यानंतर जावडे डोंगरे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले. यादरम्यान त्यांनी मुंबई फिरण्याचा प्लान केला. सकाळी सकाळी पावणेसहाच्या सुमारास दोघांनी भरधाव वेगात गाडी चालवली आणि वाहनांसाठी प्रतिबंधित असलेल्या वर्सोवा बीचवर आले. तिथेच उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी गणेश आणि बबलू वर्सोवा बीचवर झोपलेल्या दोघांना चिरडले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडलेले होते. पण काही लोकांनी मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवला होता. यात गाडीचा नंबर कैद झाला आहे. त्यामुळंच पोलिसांना आरोपींना शोधण्यास मदत मिळाली आहे. दोन्ही आरोपी तीन तासांत पकडले गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक आणि त्याचा मित्र दोघांनाही अटक करण्यात आले आहे. प्राथमिकदृष्ट्या दोघंही दारूच्या नशेत नव्हते असं दिसतं. मात्र घटना घडली तेव्हा त्यांनी मद्यपान केलं होतं का? याचा तपास करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, एसयुव्ही चालकाने अपघाताचा व्हिडिओ बनवणाऱ्यावरदेखील अपघात करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.