भटक्या प्रवाशांना कोकण रेल्वेनं दिली खुशखबर

डिसेंबर महिन्यातील थंडी आणि नाताळनिमित्त सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. यासाठी कोकण रेल्वेने नाताळ सुट्टी आणि हिवाळ्यानिमित्त विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Nov 29, 2017, 01:43 PM IST
भटक्या प्रवाशांना कोकण रेल्वेनं दिली खुशखबर title=

मुंबई : डिसेंबर महिन्यातील थंडी आणि नाताळनिमित्त सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. यासाठी कोकण रेल्वेने नाताळ सुट्टी आणि हिवाळ्यानिमित्त विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय.

अजनी-करमाळी-अजनी साप्ताहिक एक्सप्रेस, एलटीटी-करमाळी-एलटीटी एक्सप्रेस आणि एलटीटी सावंतवाडी एक्सप्रेस या विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार आहेत.

१८ डिसेंबर २०१७ ते २ जानेवारी २०१८ या कालावधीत या एक्सप्रेस धावणार आहेत.