South Korean Vlogger Harassed: साउथ कोरियाची युट्यूबर तरुणी पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. मात्र, नेमकी ही घटना कुठे घडली आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाहीये.
कैली नावाच्या कोरियन तरुणीने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिचे 1.69 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. कैली पर्यटनासाठी भारतात आली आहे. भारतातील पर्यटनाचा व्हिडिओ पोस्ट करत तिने त्यावर एक कॅप्शनही दिले आहे. सोलो ट्रॅव्हलर म्हणून भारतात एकट फिरताना, असं तिने म्हटलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती म्हणताना दिसत आहे की, तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला वाईट माणसांचे अनुभवही येतात. त्याचबरोबर तिने पुढे व्हिडिओत म्हटलं आहे की, या प्रसंगावरुन व काही लोकांच्या वर्तवणुकीवरुन भारतीयांबद्दल मत तयार करु नका, असं कैली हिने म्हटलं आहे.
कोरियन तरुणी रस्त्यावर फिरत असताना काही स्थानिक लोकांबद्दलही माहिती गोळा करत होती. त्याचवेळी एका दुकानापाशी आल्यानंतर तिने लोकांची विचारपूस करत असतानाच एक तरुण अचानक समोर आला आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्या खांद्यावर हात टाकला व त्यानंत गळ्यातदेखील हात टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. तर, या व्हिडिओत तो करुण मराठीत बोलत असल्याचे दिसतंच. तसंच, परिसर पाहून हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगण्यात येतंय.
Korean Vlogger Kelly Got Harassed In India pic.twitter.com/u1i7jCPhxu
— Anand Tate (@anandtatepajeet) December 15, 2023
भारतात आलेल्या परदेशी पर्यटक तरुणीशी गैरवर्तन केल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केल्यानंतर तिने तिथून पळ काढला. तसंच, मला इथून लवकर निघायला पाहिजे, असं म्हणत ती तिथून निघून गेली. तसंच, नंतर त्यांनी जवळजवळ मला मिठीच मारली पण मला कारण समजले नाही, असंही तिने म्हटलं आहे.
कैलीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर, एक भारतीय म्हणून या घटनेवर मी तुझी माफी मागतो, असं एका युजर्सने म्हटलं आहे. तर, एकाने अज्ञात लोकांना तुला स्पर्श करु देऊ नकोस, सुरक्षित राहा, असा प्रेमळ सल्लाही एकाने दिला आहे.