Mumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं

या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.

Updated: Jul 10, 2022, 07:13 PM IST
Mumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं title=

मुंबई : आईची निर्घृण हत्या करून 22 वर्षीय मुलाने पळ कढल्यामुळे मुंबईतील मुलुंड परिसरातील सोसायटीत खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईला मारलं असल्याने त्याने असं का केलं आणि नक्की काय घडलं असेल? अशी प्रश्न लोकांच्या मनात उपस्थीत होऊ लागली होती. परंतु त्याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घडना समोर आली. ज्यामध्ये असं समोर आलं आहे की, या मुलाने नंतर आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला.

या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.

हे प्रकरण मुलुंड येथील वर्धमान म्युनिसिपल सोसायटीमधील आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास सी-विंगच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या 46 वर्षीय छाया पांचाळ या शेजाऱ्यांना रक्त बंबाळ असल्याच्या दिसल्या. याची माहिती शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना दिली.

परंतु पोलिसांनी छाया यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या सगळ्या घटने दरम्यान छाया यांचा 22 वर्षीय मुलगा जयेश पांचाळ घरातून जाताना दिसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी जयेशचा शोध सुरू करताच त्यानेही मुलुंड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनसमोर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली.

जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आत्महत्या करताना जयेशने एक चिठ्ठी लिहिली होती, जी त्याच्या हातात पोलिसांना सापडली.

मुंबई पोलिसांचे डीसीपी प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशच्या हातात लिहिलेली चिठ्ठीही सापडली, त्यात त्याने धारदार चाकूने आईचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण संपत्तीच्या वादातून असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परंतु या प्रकरणासंबंधीत संपूर्ण माहिती अजूनही समोर आलेली नाही.