पराग ढोबळे, झी मिडीया, नागपूर : आजकाल सोशल अॅप्सवरून बऱ्याच ओळखी होतात. मग या ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं. आभासी माध्यमातून झालेल्या ओळखीत सगळं काही आभासी पद्धतीनं उभं केलं जातं. पण जेव्हा फसवणूक झाल्याचं कळतं तो पर्यंत बरेचदा उशीर झाला असतो. नागपुरात अशाचं पध्दतीनं स्नॅपचाट अॅपवरून ओळख नंतर प्रेम त्यानंतर चक्क फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पाचपावली पोलिसांनी त्या 26 वर्षीय सराईत गुन्हेगारला अटक केली असून कुणाला गणेश यादव असं आरोपीचं नाव आहे.
शाळेत शिकत असलेली 15 वर्षीय मुलगी तिचे वडील सरकारी नोकरीत आणि आई गृहिणी. मुलीलाला मोबाईलच वेड. याच अल्पवयीन मुलीची स्नॅपचाट अॅपवरून कुणाल नामक तरुणाशी ओळख झाली. कुणाल स्वतःची ओळख करून देताना स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून चक्क यूपीएससीची तयारी करत असल्याचं सांगत बनाव केला. अवघ्या पंधराव्या वर्षी मैत्री वाढत गेली. कुणालवर डोळे झाकून विश्वास बसला आणि प्रेम जडलं. तोपर्यंत कुणाल हा सराईत गुन्हेगार असल्याची साधा पत्ताही पीडित मुलीला लागला नाही इथंच ती फसली. दोन वर्षांचा मैत्रीत बरच काही घडून गेलं.
कुणाल हा सुरुवातीला अभ्यासाच्या नावानं कधी 200 कधी 500 रुपये पीडित मुलीकडून घ्यायचा ती सुद्धा त्याला द्यायची. पीडित मुलीचे वडील हे सरकारी नोकरीत असल्याचं कुणालला कळून चुकलं होतं. याच संधीचा फायदा घेत मुलीच्या जवळ पैसे नक्कीच असेल म्हणून प्रेमाच्या जाळयात फसवलं.
शक्कल लढवत गरज पडल्यास खंडणीसाठीचा उद्देशानं त्यानं तिच्या सोबत अनेक फोटो सुद्धा काढून घेतलेय. एकदा कुणालाने तिला यूपीएससीच्या तयारीसाठी पैशाची गरज असल्याचं सांगितलं. मुलीकडं पैश्यांची मागणी केली. पण तीन पैसे देण्यास नकार दिला.
यात मुलगी पैसे देणार नाही असं लक्षात आल्यावर पीडित मुलीला कुणालनं धमकवण्यास सुरवात केली. पैसे दे नाही तर दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर टाकतो आणि तुझा आई वडिलांना पाठवतो अशी धमकी दिली. पीडित मुलगी घाबरली. याचाच फायदा घेत कुणाल यादवने घेतला. घरातील आईचं सोनं आणि दागिने आणण्यासं तिला सक्ती केली. आपलं प्रेमप्रकरण घरच्यांना समजेल म्हणून तिनं स्वतःचा घरात चोरी केली
अखेर तिने सोन्याचे दागिने प्रियकर कुणालाल आणून दिलेत. काही दिवस घरातही लक्षात आलं नाही. पण जेव्हा लग्न समारंभात जाण्यासाठी सोन्याचे दागिने कुटुंबीयांनी शोधले. तेव्हा मात्र पिडत मुलीनं आपबीती सर्व आई वडिलांना सांगितली.
पीडित मुलीच्या वडिलांनी पाचपावली पोलिस स्टेशन गाठत आरोपीला तक्रार दिली. पाचपावाली पोलिसांनी सुध्दा कुणाला गणेश यादवला अटक केली. कुणाल यादव हा सराईत गुन्हेगार असल्याचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितलं. त्या चोरीचे गुन्हे आणि अवैध शस्त्र बाळगण्याचा तसेच गोंदिया जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यात सोन्याच्या दागिन्यांचं नेमकं काय केलं, याचा शोध पाचपावली पोलीस करत आहे.