कर्जत : गेल्या काही दिवसात जोरदार पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जमीन खचणे, तडे जाणे असे प्रकार घडतात. मात्र, जमिनीखालून गरम वाफ तसेच धूर येण्याचा प्रकार कर्जतमध्ये समोर आलाय.
कर्जत इथल्या अंबा माता मंदिराच्या समोर जमिनीतून धूर निघत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. एका सजग नागरिकानं याची माहिती कर्जत आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच कर्जत नगरपरिषदेच्या आपत्तकालीन विभागाचे तसेच तहसिल कार्यालयाच्या आपतकालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.
जमिनीतून धूर आणि गरम वाफा निघत असल्याने प्रशासनाने भूगर्भतज्ज्ञांना पाचारण केलं. तज्ज्ञांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार हा सर्व प्रकार नैसर्गिक नसल्याची माहिती समोर आलीय.
या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कर्जत तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी नागरिकांना केलंय.