नाशिक : नाशिकमध्ये गुरदयाळ दिलबाग राय त्रिखा यांना अभिनेता ऋतिक रोशनप्रमाणे एका हाताला ६ बोटं आहेत. पण त्रिखा यांच्यासाठी हे त्रासाच कारण बनलय.
आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी ते ८ महिने लढले. त्यांना सर्व आधार नोंदणी केंद्रातून परत पाठविले गेले. त्यांच्या सहाव्या बोटाचा ठसा घेणं कठीण होत असल्याच कारण त्यांना सांगितलं जातंय.
आधार बनवताना इतर बायोमॅट्रिक माहिती घेण्याऐवजी दोन्ही हातांच्या बोटांचे निशाण अनिवार्य आहेत. त्रिशा यांच्या हातावरील सहावे बोट पृष्ठभागावर बसत नाही.
ते सरकारी अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. पण तिथेही त्यांचे आधारचे काम झाले नाही. माध्यमांमध्ये या विषयाची चर्चा झाली.
मराठी चॅनल्सनी याची गांभिर्याने दखल घेतली. त्यानंतर शिखा यांची आधार केंद्रावर पुन्हा नोंदणी करण्यात आली. तेव्हा बायोमॅट्रिकच्या पृष्ठभागावरचे निशाण स्वीकारले गेले.