फेसबुकवर या पोलिसाचे दिवसभरात 'लाख्खो चाहते'

पोलिसातली सर्जनशीलता खाकीत झाकली जाऊ शकत नाही. उलट पोलिसाची सर्जनशीलता देखील या खाकीवर शोभून दिसतेय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 25, 2017, 05:17 PM IST
फेसबुकवर या पोलिसाचे दिवसभरात 'लाख्खो चाहते' title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : खाकीतल्या पोलिसाला सर्वसामान्य माणूस तसा घाबरूनच असतो, खाकीतल्या पोलिसापासून दूर राहणाऱ्या सर्वांसाठी, या पोलिसाचा व्हिडीओ महत्वाचा आहे. पोलिसातली सर्जनशीलता खाकीत झाकली जाऊ शकत नाही. उलट पोलिसाची सर्जनशीलता देखील या खाकीवर शोभून दिसतेय.

ताण तणावात जपले सूर

पोलिसांना खरा आरोपी शोधण्यासाठी रोज खऱ्या आणि खोट्याचा सामना करावा लागतो, हा ताण सतत मनावर असताना, सुरेल गाणं गाता येणं, ते जोपासणं आणि सहकाऱ्यांनाही त्याचा आनंद देणं, हे पोलीस दलातील तणाव कमी करण्यासाठी नक्कीच महत्वाचं आहे.

पोलिसातील कलाकार

जळगाव पोलिसातील हे संघपाल तायडे आहेत. त्यांच्या गाण्यांनी फेसबुकवरील नेटीझन्स मंत्रमुग्ध होतात, त्यांच्या गाण्याच्या पोस्ट फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहेत. महत्वाचं म्हणजे कोणतंही संगीत नसताना, संघपाल तायडे हे संगीताची साथ असताना गाण्याचा जो दर्जा असतो, तो दर्जाचं ते गातात.

पोलीस दलाकडून प्रोत्साहन आवश्यक

खाकीत एक सर्जनशीलता लपलेली असते, असा संदेश संघपाल जेव्हा खाकीवर गातात तेव्हा जातो, ही बाब पोलीस दलासाठी पोलिसांसाठी सुखावणारी आहे, मात्र संघपाल तायडे यांचा पोलीस दलाने, घरचा सन्मान म्हणून त्यांच्या गाण्याची दखल घेणे देखील आवश्यक आहे.