राज्यातील 'या' जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत मनाई आदेश, असणार 'ही' बंधने

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 जुलै 2021पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.  

Updated: Jul 9, 2021, 10:04 AM IST
राज्यातील 'या' जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत मनाई आदेश, असणार 'ही' बंधने title=

मुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg Collector) कोविडचे नियम आणि बंधने कायम आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात 22 जुलै 2021पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यामुळे कोणाला जमाव करता येणार नाही आणि मिरवणुका काढता येणार नाही. (Sindhudurg Collector issues Prohibition Order till 22nd july 2021)

महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37(1) (3) नुसार जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई असणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे मनाई आदेश जारी केले आहेत.  

जिल्ह्यात अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कोणत्याही प्रकारची निदर्शन करता येणार नाही. मिरवणुकीही काढता येणार नाहीत. व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखाविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे, कलम 37 (3) नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणूका काढणे आणि सभा घेणे यास मनाई असेल.

हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये आणि अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते. ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा याना लागू पडणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.