बदलापूर : श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला अखेर अटक करण्यात आलीय. सुमारे वर्षभरापूर्वी हा ३०० ते ४०० कोटी रूपयांचा गैरव्यवहार उजेडात आला होता.
गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक व्याज देण्याचं आमीष दाखवून श्रीराम इन्व्हेस्टमेंटनं तब्बल ४ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. नोटाबंदीनंतर जानेवारी २०१७ पासून गुंतवणूकदारांना व्याज मिळणं बंद झालं. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यापासून श्रीराम समुद्र फरार होता.
याप्रकरणी त्याचे वडील सुहास आणि आई सुनीता समुद्र यांनाही अटक झाली होती. मात्र वार्धक्यामुळं त्यांना जामीन मिळाला होता. आता श्रीराम समुद्रला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.