श्रावणी सोमवार: राज्यातील ज्योर्तिलिंग मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी

राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. 

Updated: Aug 13, 2018, 08:44 AM IST
श्रावणी सोमवार: राज्यातील ज्योर्तिलिंग मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी title=

मुंबई: आज (सोमवार,१३ ऑगस्ट) पहिला श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. त्र्यंबकेश्वरसह घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भिमाशंकर इथं भाविकांची रीघ लागलीय. हर..हर..महादेवचा गजर करत भाविक दर्शन घेताहेत. या मंदिरांमध्ये विशेष पुजेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्याच्या इतरही भागातील प्रसिद्ध महादेव मंदिरात पूजा-अभिषेक करण्यासाठी महिला वर्गासह भाविकांची लगबग दिसतेय.

हर..हर..महादेवचा गजर

राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. त्र्यंबकेश्वरसह घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भिमाशंकर इथं भाविकांची रीघ लागलीय. हर..हर..महादेवचा गजर करत भाविक दर्शन घेताहेत.

मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी

दरम्यान, पहिला श्रावणी सोमवार असल्याने शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केलीये. दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांनी बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी चांगलीच गर्दी केलीय.