Shraddha Walkar Murder Case Updates: मुंबईतील श्रद्धा वालकर मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर (shraddha walker murder case Delhi) नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) आफताबनं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अफताबने (Aftab amin poonawa arrested) हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. तर, श्रद्धाच्या मृत्यूनंतर अफताब त्याच घरात दुसऱ्या मुलींसोबत संबंध ठेवत होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात हे सत्य उघड झाले आहे.
मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी घेतला स्पेशल फ्रीज
आफताबचे सत्य समोर येऊ नये म्हणून त्याने थंड डोक्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. 300 लिटरचा फ्रीज खरेदी केला. यामध्ये त्याने हे तुकडे काही पिशव्यांमध्ये भरून तब्बल 18 दिवस ठेवले होते. कोणालाही संशय येऊ नये, म्हणून तो त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. मृतदेहाची दुर्गंधी घरात पसरू नये म्हणून तो अगरबत्ती पेटवत असे. त्याचवेळी त्याचे अन्य एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. श्रद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये असतानाच अफताब त्याचवेळी दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवत होता.
दोघेही मूळचे वसईतलेच होते. श्रद्धाच्या या प्रेमप्रकरणाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. पण हा विरोध झुगारून ती आफताब सोबत लिव्ह इन रिलॅशनशिपमध्ये राहत होती. तिने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्यानं त्यानं तिची हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
वाचा : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर
पोलिसांना आतापर्यंत 12 तुकडे सापडले
दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून आतापर्यंत 12 तुकडे सापडले आहेत. मात्र हे तुकडे श्रद्धाच्या शरीराचे आहेत की नाही हे स्पष्ट झालेले नाही. यासाठी फॉरेन्सिक तज्ञ सापडलेल्या तुकड्यांचे परीक्षण करतील. पोलीस आता श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए घेऊन ते जंगलात सापडलेल्या तुकड्यांसोबत चेक करणार असून हे श्रद्धाचे शरीराचे अवयव आहेत का हे शोधून काढणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की जप्त केलेले संशयित अवशेष हे सर्व मानवी अवशेष आहेत की नाही याची पुष्टी करण्यासाठी पाठवले जात आहेत. त्यांना श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनए नमुन्याशी जुळण्यासाठीही पाठवण्यात येणार आहे. याशिवाय अन्य भागांचा शोध सुरू आहे.
मृतदेह कापण्यासाठी वापरलेले हत्यार शोधत आहे
आरोपी आफताबने कोणत्या शस्त्राने श्रद्धाचे तुकडे केले याचाही पोलिस शोध घेत आहेत. चौकशीदरम्यान आफताबने ज्या शस्त्राने श्रद्धाचा मृतदेह कापला होता. त्याच शस्त्राने त्याने दिल्लीतील डस्टबिनमध्ये फेकून दिल्याचे समोर आले आहे. त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. यासोबतच आफताबने श्रद्धा आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे एमसीडीच्या कचरा संकलन व्हॅनमध्ये टाकले होते.