UPSC Success Story : लातूर येथील एका दुकानदाराच्या मुलाने नागरी सेवा परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. उदगीर तहसील येथील रामेश्वर सुधाकर सबनवाड याने गेल्या दिवशी जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षा 2021 च्या निकालात 202 वा क्रमांक पटकावला आहे.
रामेश्वरने सुरुवातीचे शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातून केले. त्यानंतर त्याने पुण्यातून इंजिनीअरिंग पूर्ण केले. रामेश्वरच्या म्हणण्यानुसार त्याने दुसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले आहे.
रामेश्वरचे वडील दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहे. त्याच्या यशानंतर घरात जल्लोषाचे वातावरण आहे. यावर्षी UPSC परीक्षेत एकूण 685 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये 508 पुरुष आणि 177 महिला उमेदवार आहेत.