धक्कादायक, वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड, एका अवयवाची चोरी?

वाघाच्या अवयवांची चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आलाय. 

Updated: Feb 24, 2018, 01:22 PM IST
धक्कादायक, वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड, एका अवयवाची चोरी?  title=

नागपूर : वाघाच्या अवयवांची चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आलाय. नागपूरमधील मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी डॉ. बहार बाविस्कर यांच्यावर हे धक्कादायक आरोप केलेत. 

अवयव चोरीची तक्रार

वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड करताना, अवयव चोरी केल्याची तक्रार हाते यांनी  उपवनसंरक्षकांकडे केलीय. नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केलाय.

सीसीटीव्ही फुटेज हाती

या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजही झी मीडियाच्या हाती लागलंय. मात्र ही तक्रार तथ्यहिन असल्याचा दावा डॉ बाविस्कर यांनी केलाय. 

 त्या दिवशी नेमकं काय घडलं?

-  डॉक्टर बाविस्कर ट्रान्झिर सेंटरमध्ये  9 वाजून 12 मिनिटांनीच पोहोचल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत.

-  डॉक्टर बाविस्कर  11.51.50 पासून वाघाचे अवयव असलेली बॉटल बॅगमध्ये टाकताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

-  अवयव घेऊन कारच्या दिशेकडे जातानाची दृष्यं सीसीटीव्हीत दिसत आहेत.