धक्कादायक प्रकार उघड, शालेय पोषण आहार ऐवजी पशु आहार

शालेय विद्यार्थ्यांच्याबाबत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. पुण्यातील हडफसर येथील पालिकेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय.  

Updated: Mar 20, 2021, 01:16 PM IST
धक्कादायक प्रकार उघड, शालेय पोषण आहार ऐवजी पशु आहार title=

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्याबाबत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. पुण्यातील हडफसर येथील पालिकेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. चक्क शालेय पोषण आहार (shaley poshan aahar yojana) येण्या ऐवजी पशु आहार आल्याचे स्पष्ट झाल आहे. जनावरांना दिला जाणारा निकृष्ठ दर्जाचा हरभरा आणि तूरडाळ भरलेल्या बॅगचा टेम्पो शाळेत पोहचला होता. सुदैवाने त्याच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात झालेल नसलं तरी वितरण व्यवस्थेतील गलथान कारभार समोर आला आहे.

दरम्यान, ज्या आहाराचा पुरवठा करणाऱ्यात आला आहे, त्या बॅगेचे वजनही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे काय जनावरांचे फोटो आणि जनावरांचा आहार असल्याचे स्पष्ट उल्लेख त्या बॅगेवर दिसून येत आहे. असे असताना हा पशु आहार शाळेत पाठवला कसा, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

हडपसर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 58 मुलींची येथे ही घटना घडली. मुंबई येथील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑफ कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेड यांच्याकडून या कडधान्याचा पुरवठा करण्यात येत असतो. याबाबत आता संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

या धक्कादायक प्रकाराबाबत नगरसेविका तथा माजी महापौर वैशाली बनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही लहान मुले आहेत. त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. ती मुले नाही का, त्यांची चेष्टा करता का, असे सवाल वैशाली बनकर यांनी उपस्थित केले आहेत.