ज्यांनी लाड करायचे त्यांनीच घात केला, आजोबा आणि दोन काकांकडून घाणेरडं कृत्य

सख्ख्या आजोबांचा आपल्या अल्पवयीन नातीवरच डोळा, काकांनीही सोडलं नाही

Updated: May 25, 2022, 07:15 PM IST
ज्यांनी लाड करायचे त्यांनीच घात केला, आजोबा आणि दोन काकांकडून घाणेरडं कृत्य title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. ज्यांनी लाड करायचे त्यांनीच घात केला. सख्ख्या आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दित घडली आहे. 

याप्रकरणी नराधम आजोबासह आणखी दोन जणांवर पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या नराधमांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यशवंत तातोबा कमाने (वय 67) असं पीडित मुलीच्या आजोबाचं नावं आहे. तर विलास देवराम तुमसरे (वय 56) आणि अनिल सेलोकर (वय 25) असं इतर दोन आरोपींची नावं आहेत.

पीडित मुलगी ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला. आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा अत्याचार होत होता. 11 वर्षाची असतांना तिला पहिला अत्याचारांचा सामना करावा लागला. 2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असतांना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. 

त्यानंतर, घटनेबाबत वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी तिला दिली. पीडित मुलीने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढली आणि त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. 

धक्कादायक म्हणजे सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. नात्यात काका लागणाऱ्या अनिल सेलोकर यानेही या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 

मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.

तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र नात्यातील व्यक्तिद्वारे असा किळसवाना प्रकार झाल्याने नात्यावर विश्वास ठेवावा कसा असा प्रश्न आता समोर आला आहे.