धक्कादायक! क्वारंटाईन असलेले ३० जण पळाले, जिल्ह्यात खळबळ

अकोल्याच्या पातूरमधील प्रकार ​

Updated: Apr 16, 2020, 12:14 PM IST
धक्कादायक! क्वारंटाईन असलेले ३० जण पळाले, जिल्ह्यात खळबळ   title=

अकोला : जिल्ह्यातील पातूर येथील क्वारंटाईन सेंटरमधून ३० मजूर आणि विद्यार्थी पळून गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघड झाला होता मात्र आपली नाचक्की लपविण्यासाठी प्रशासनाकडून ही संपूर्ण माहिती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.  या सर्व जणांना पातूरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं आहे. 

हे सर्व मजूर आणि विद्यार्थी तेलंगानातील असून त्यांचा प्रवास झाला होता त्यामुले त्यांना ३० मार्चपासून  पातूरात थांबण्यात आलं होतं. या ठिकाणी या ३० जणांना योग्य त्या सर्व  सुख सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस यंत्रणा येथे कार्यरत असूनही ३० जणांनी पळ कसा काढला? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन आता फरार लोकांचा शोध घेत आहे. .महत्वाचं म्हणजे हे सर्व पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण नसून त्यांना लॉक डाउन संपेपर्यंत किंवा पुढील आदेशपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं होत.

यांच्या पळून जाण्याने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. क्वारंटाईन असताना पोलिस बंदोबस्तातील हे ३० जण कसे पळून गेले हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. या घटनेने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एखाद्या व्यक्तीने प्रवास केला असेल तर त्या व्यक्तीला क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे.