पुण्यात २६ वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार

पुण्याला हादरवणारी घटना 

Updated: Dec 28, 2020, 05:49 PM IST
पुण्यात २६ वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार  title=

पुणे : पुण्यात २६ वर्षीय तरुणीवर (26 years old Girl rape in Pune)  बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार झालेली पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्समधील एअर होस्टेस  (Indigo Air Line Air Hostess) असल्याची माहिती मिळत आहे. वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. तरूणीची आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती.

आरोपीची आणि पीडित तरुणीची टिंडर वरून ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे. टिंडर हे ऑनलाइन डेटिंग ऍप असून तरूणाईत या ऍपला सर्वाधिक पसंती आहे.  तरुणीवर अत्याचार करून तिला जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. 

अभिजीत सीताराम वाघ असं संशयित आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.