शिवशाही बसला अपघात, 2 ठार तर 18 प्रवासी जखमी

शिवशाही बसला अपघात

Updated: May 30, 2018, 07:52 PM IST
शिवशाही बसला अपघात, 2 ठार तर 18 प्रवासी जखमी title=

यवतमाळ : यवतमाळमधून शिवशाही बसच्या अपघाताची बातमी समोर येतेय. ट्रकला ओव्हरटेक करायला गेलेल्या शिवशाही बसचा अपघात झालाय. या अपघातात दोन प्रवासी ठार झालेत तर १८ प्रवासी गंभीर जखमी झालेत. नागपूर मार्गावरील बेलोणा गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या शिवशाही बसच्या ड्रायव्हरने केला होता. परंतु, समोरून दुचाकीस्वार आल्यानं त्याला सांभाळण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला... आणि हा अपघात घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.