इगतपुरीमध्ये शिवसेना तर त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप पुन्हा सत्तेत

इगतपुरीमध्ये शिवसेनेचे संजय इंदुलकर नगराध्यक्ष झाले आहेत. १८ जागांपैकी १३ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 03:45 PM IST
इगतपुरीमध्ये शिवसेना तर त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप पुन्हा सत्तेत title=

नाशिक : इगतपुरीमध्ये शिवसेनेचे संजय इंदुलकर नगराध्यक्ष झाले आहेत. १८ जागांपैकी १३ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

इगतपुरीमध्ये याआधी शिवसेनेचीच सत्ता होती. त्यामुळे त्यांना आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळालं आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये देखील भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे.

त्रंबकेश्वरमध्ये १७ पैकी १५ जागा भाजपने मिळवल्या आहेत. पुरूषोत्तम लोहगावकर थेट नगराध्यक्षपदी निवडुन आले आहेत. भाजपनेही आपली सत्ता कायम राख्ण्यात यश मिळवले आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही या ठिकाणी प्रतिस्पर्धी होते. दोघांमध्ये जोरदार चुरस होती. पण दोघांनीही आपले स्थान कायम राखत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धुळ चारली आहे.