भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच शिवसेना पाडणार खिंडार?

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीची मते फोडण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा एका मंत्र्याने केलाय.

Updated: Jun 8, 2022, 04:38 PM IST
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच शिवसेना पाडणार खिंडार? title=

औरंगाबाद : राज्यसभा निवडणुकीत ( RAJYSABHA ELECTION ) भाजपने ( BJP ) तिसरा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. छोटे पक्षच आणि अपक्ष आमदार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी ( MAHAVIKAS AGHADI ) आणि भाजपमध्ये ( BJP ) जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

दोन्ही बाजूने आपलेच उमेदवार निवडून येणार असा दावा केला जात आहे. अशातच आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( ABDUL SATTAR ) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. औरंगाबाद येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी होणार. विना पैशांचे लोक येणार. स्वतः पक्ष प्रमुख येणार म्हणजे गर्दी होईल. मुख्यमंत्री काय बोलतात ते बघा. भाजपच्या हृदयाचे ठोके वाढतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

आम्ही शेंडी जानवे सगळ्यांच्या सन्मान करतो. त्यामुळे आमच्यावर टीका करणे योग्य नाही. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत. मात्र, आम्ही सगळ्यांचा आदर करतो. तसेच, संभाजीनगर बाबत काय घोषणा करायची ते मुख्यमंत्री ठरवेल असेही त्यांनी सांगितले. 

राज्यसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( RAVSAHAEB DANVE ) यांच्या घरामध्येच आम्ही सुरुंग लावणार आहोत. भाजपचे एक मत आम्ही फोडणार आहोत. रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि भोकरदन आमदार स्वतः महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत, असा खळबळजनक दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.