माझा कंट्रोल मातोश्रीवर; आता उद्धव ठाकरेंशीच बोलेन- अब्दुल सत्तार

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या. मी राजीनामा दिला की नाही

Updated: Jan 5, 2020, 04:46 PM IST
माझा कंट्रोल मातोश्रीवर; आता उद्धव ठाकरेंशीच बोलेन- अब्दुल सत्तार title=

औरंगाबाद: माझा सर्व कंट्रोल हा मातोश्रीवर आहे. त्यामुळे आता मी जे काही बोलायचे आहे, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलेन, असे शिवसेनेचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदावर बोळवण झाल्यामुळे अब्दुल्ल सत्तार नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा होती. त्यामुळे आज दिवसभर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापताना दिसले.

अब्दुल सत्तार गद्दार, 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका- चंद्रकांत खैरे

मात्र, तब्बल नऊ तास मौन बाळगल्यानंतर शनिवारी संध्याकाळी अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी निर्णय घेईन. मी राजीनामा दिला नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या. मी राजीनामा दिला की नाही, हे तशा पुड्या सोडणाऱ्यांनाच विचारा. माझा सर्व कंट्रोल हा मातोश्रीवरच आहे. त्यामुळे आता मी उद्धव ठाकरे यांच्याशीच संवाद साधेन. यानंतर उद्धव ठाकरे तुम्हाला याबाबत माहिती देईल. मीदेखील वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तर देईन, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

आमदार गोरंट्याल यांचे बैठकीत ठरलं, समर्थकांसह राजीनामा देणार

तत्पूर्वी आज सकाळी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आज सकाळपासून सत्तार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. या शिष्टाईला आता काहीप्रमाणात यश आल्याचे दिसत आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार आजच मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.