VIDEO : राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे - संजय राऊत

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी  नारायण राणे (Narayan Ran) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपलाही त्यांनी  इशारा दिला. 

Updated: Aug 28, 2021, 02:32 PM IST
VIDEO : राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे - संजय राऊत  title=

नाशिक : Sanjay Raut in Nashik भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आधार देणे आवश्यक आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. लाखो शिवसैनिक राणे यांच्यासाठी प्रार्थना करतील, असे राऊत म्हणाले. राणे आज जे बोलत आहेत त्याचा भविष्यात त्यांना पश्चात्ताप होईल असेही ते म्हणाले. (Sanjay Raut on BJP and Narayan Rane)

 संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे.  नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे सूचक विधान केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपला (BJP) इशारा दिला आहे. भाजपने नारायण राणे यांच्या खांद्यावरून बंदूक चालवू नये, आमच्याकडेही खांद्यांची कमी नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. बंदूक चालवण्यासाठीही खांदे आहेत. तसेच खांदे देण्यासाठीही भरपूर खांदे आहेत, असे ते म्हणाले. तुम्ही भान सोडलंत तर आम्हीही बेभान होऊ, असा स्पष्ट इशारा त्यांनी राणे यांना दिला. यापुढे प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे ते म्हणाले. (Shiv Sena MP Sanjay Raut Attacks on Narayan Rane)

संजय राऊत Press conference ठळकबाबी :

- नाशिकमध्ये असाच पराक्रम सुरू ठेवा
- महाविकास आघाडीचे सरकार उत्तम सुरू आहे
- 100 टक्के समाधानकारक काम करू शकत नाही
 - मोदी असो की ठाकरे, जनतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काम करावे लागते
 - यात्रा हा धार्मिक शब्द आहे अशा यात्रांची सवय आहे
 - शिवसेना अशीच यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेला गालबोट लावण्याची हिम्मत करणार नाही. 
- अचानक अनेक घडामोडी घडविल्या जात आहेत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी म्हणून आलो खाजगी कार्यक्रम होता आपण कार्यक्रम लाईव्ह केला
 - नाशिकचे पोलीस आयुक्त यांना दोन दशकापासून ओळखतो आमचे कोटुंबिक संबंध आहेत ..म्हणून आयुक्तालयात गेलो आणि भेटलो
 - एकादा गुन्हा कुठेही दाखल होऊ शकतो, कायदा सर्वांसाठी समान , मंत्री आहे की व्यक्ती तर प्रत्येकाला हक्क आहे. कायद्याचं राज्य आहे
 -  या फरार नागरसेवकानानी अंतरिम बेल मिळाला असे त्यांनी सांगितले म्हणून ते माझ्यासोबत उभे. मी त्यांना तातडीने हजार व्हा असे सांगितले ते हजर झालेत

  राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

 -  नारायण राणे हे केंद्रातील मंत्री आहे त्यांनी कायद्याचं पालन केले पाहिजे मात्र जेव्हा आपण गुन्हा करतो त्यावेळेस आपण काय आदर्श ठेवतो 
-  घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांनी हे पाळले पाहिजे. त्यांची प्रकृती बरी नसते. 
-  मनस्वास्थ्य बिघडते तेव्हा त्यांना आधार द्यायला हवा.मला त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. 
-  आज शिवसेनाप्रमुख यांच्याशी बोलणार आहे. लाखो शिवसेऐनिक दररोज एक मिनिट सकाळी प्रार्थना करतील. त्यांनी योगा करावा विपश्यना करावी
-  त्यांचा मंनस्वस्थयास आराम पडावा म्हणून सेना करेलच भाजपने पण करावे
-  भाजप सेना एकमेकांनाविरोधात संघर्ष होणे योग्य नाही . आम्ही 35 वर्ष एकत्र नांदलो.
-  हिंदुत्वाच नाते कायम होते मात्र एका व्यक्तीमुळे वैरी झालो की काय असे वाटू लागलंय याचे आम्हाला दुःख आहे
-  नारायण राणे बोलतात ते फडणवीस, शेलार, पाटील बोलू शकत नाही त्यांची हे संस्कार संस्कृती नाही. त्यांच्या तोंडून चिखलफेक केली जाते
- विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री यांची भेट आक्षेप नाही बंद दरवाज्याड काहीच गुप्त राहत नाही
- राणे यांना भविष्यात पश्चाताप होईल त्यांना कळेल कसे वापरून घेण्यात आले आहे.