किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, गडावरील वातावरण शिवमय

Shiv Jayanti celebration : छत्रपती शिवरायांच जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) या निमित्ताने गडावरील वातावरण शिवमय झाले आहे.  

Updated: Feb 19, 2022, 09:13 AM IST
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, गडावरील वातावरण शिवमय  title=

पुणे : Shiv Jayanti celebration : छत्रपती शिवरायांच जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) या निमित्ताने गडावरील वातावरण शिवमय झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यासाठी उपस्थित असणार आहे. 

प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर उपस्थित राहणार नाहीत. शिवनेरी किल्ल्यावर राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती कार्यक्रमाच आयोजन करण्यात येते. आज या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत. 

गडावर पोवाडे तसेच मर्दानी खेळ सादर होत आहेत. शिवजन्मस्थळावर फुलांची छान सजावट करण्यात आली आहे. जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने बाळ शिवाजीचा पाळणा सजवण्यात आला आहे. पारंपारिक वेशभूषा करून आलेल्या  महिला शिवजन्माचा पाळणा गाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच मान्यवर पाळण्याची दोरी हाती घेऊन बाळ शिवाजीच्या पालण्याला झोका देतील. 'जय भवानी, जय शिवराय'च्या जयघोषाने संबंध परिसर दुमदुमून गेला आहे.