Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: वर्षातून दोनदा शिवजयंती; नेमका वाद काय?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार (Shivaji Maharaj Jayanti By Tithi) आणि तिथीनुसार केली जाते. यावर्षी आपण सर्वांनी दोन्ही प्रकारे ही जयंती (Shivaji Maharaj Jayanti By Date) साजरी केली आहे परंतु अनेक वर्षे महाराजांच्या जयंतीवरून वाद आहे. या लेखातून जाणून घेऊया की हा वाद नेमका कोणता आहे, आणि तो कशावरून सुरू झाला? 

Updated: Mar 10, 2023, 12:09 PM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: वर्षातून दोनदा शिवजयंती; नेमका वाद काय? title=
Shiv Jayanti 2023 Messages Quotes Know All about Chhatrapati Shivaji Maharaj Birth Date Tithi

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आपल्या महाराष्ट्राची शान अन् अभिमान असलेले आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj Jayanti Tithi 2023) यांची आज तिथीनूसार जयंती आहे. मागच्या माहिन्यात 19 फेब्रुवारीला त्यांची तारखेनं जयंती दिमाखात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वर्षांनंतरही आपण आठवण काढतो. असाच एकही दिवस नाही जेव्हा त्यांच्याबद्दल बोललं, वाचलं  अन् लिहिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj Jayanti Controversy) स्वराज स्थापन केलं. मुघलांसारखे क्रुर शासक भारतावर राज्य करत असताना त्यांच्याशी लढा देत शिवराय व त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांनी स्वराज्यांच्या रक्षणासाठी आणि पोषाणासाठी एक एक क्षण सत्कारणी लावला, आणि आज आपल्याला तोच बलशाली महाराष्ट्र पाहायला मिळतो आहे. (Shiv Jayanti 2023 Messages Quotes Know All about Chhatrapati Shivaji Maharaj Birth Date Tithi)

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनूसार (Shivaji Maharaj Jayanti By Tithi)  जयंती साधारण मार्च महिन्यात येते. आज, 10 मार्चला त्यांची तिथीनूसार जयंती आपण सर्वच जण करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनं आपण 19 फेब्रुवारीला करतो. परंतु त्यांच्या जयंतीनिमित्तही वादंग उठल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, परंतु हा वाद नक्की काय आहे? जाणून घेऊया या लेखातून. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म नक्की कधी झाला? 

तिथीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा तृतीयेला झाला आहे. आज तृतीया आहे. त्यामुळे तिथीनुसार त्यांची जयंती ही आज येते. तर तारखेनुसार आपण याच वर्षी 19 फेब्रुवारीला ती साजरी केली. 2000 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत (Vidhasabha Shivaji Maharaj Jayati Proposal) पास झालेल्या प्रस्तावानुसार, शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. परंतु हिंदू पंचांगानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीयेला झाला. तेव्हा शक 1551 होते. तर दुसरीही अशी एक तारीख समोर येते की, वैशाख महिन्यातील द्वितियेला म्हणजे शक 1549 नुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1927 ला झाला होता. यामध्ये अनेकदा मतमतांतरे झाले आहेत. 

नक्की वाद कधी सुरू झाला? 

मागील वर्षी सत्तापालट झाल्यानंतर विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद उठला होता. त्यातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये बाताबातीही सुरू झाली. हिंदू पंचांगानुसार शिवरायांची जयंती ही तिथीनुसार साजरी करावी तर तारखेनुसार 19 फेब्रुवारीला साजरी करावी यावर धुमसान सुरू झाले होते. 

संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारमध्ये शिवरायांच्या जयंतीच्या वादाचे पडसाद पाहायला मिळतात. 1966 मध्ये इतिहासकारांच्या समवेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची तारीख निश्चित करण्याासाठी सांगण्यात आले होते. यात समितीतून शिवरायांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 ला झाला आहे या निष्कर्षावर आले होते तर इतिहासकार एन.आर. फाटक यांनी 6 एप्रिल 1927 ला झाला असल्याचे समितीसमोर मांडले होते. तेव्हाही अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याचे लक्षात आले होते.