मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरणात संबंध नसलेल्या व्यक्तींवर खटले भरल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.
- केंद्र सरकारला एनआयए चौकशीचा अधिकार आहे. पण राज्याला पण अधिकार आहे.
- पोलिसांचा चौकशीचा दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष नाही केलं गेलं पाहिजे.
- भीमा कोरेगाव हिंसेच्या आधी एल्गार परिषद झाली होती. ही फक्त पळवाट आहे.
- भीमा कोरेगाव वेगळं आणि एल्गार परिषद वेगळं प्रकरण आहे. असं माझं म्हणणं आहे.
- या सगळ्या प्रकरणात जी चौकशी झाली आहे त्यामध्ये पुणे पोलिसांचा दृष्टीकोन चिंताजनक आहे.
- माझी मागणी एल्गार परिषदेच्या बाबतीत जो सत्तेचा गैरवापर झाला त्याची चौकशी करण्याची आहे.
- एल्गार परिषदेतील काही लोकांचे साहित्यिक आक्रमक असले तरी त्यांना मी देशाच्या विरोधी म्हणणार नाही.
- सत्यता बाहेर येईल म्हणून राज्य सरकारकडून ही चौकशी काढून घेण्यात आली.
- पुणे पोलिसांचं वर्तन आणि त्याच्या मागे असलेल्या लोकांची चौकशी झाली पाहिजे यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी आमची आहे.
- राज्य सरकारने या संबंधित माहिती जी कोर्टासमोर दिली. त्याबाबत पुरावे असे तयार करण्यात आले की, ज्यामुळे त्यांना जामीन मिळाला नाही.
- संभाजी भिडे आणि एकबोटे यांनी या आजुबाजुच्या गावात एक वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून ही हिंसा झाली.
- संबंध नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. एल्गार आणि भीमा कोरेगावचा काही संबंध नव्हता.
- एल्गार परिषदमध्ये उपस्थित नसलेल्यांवरही खटलं भरण्यात आले.