... आणि शरद पवार यांच्या संतापाचा भडका उडाला

शरद पवार यांच्या संतापाचा शुक्रवारी भडका उडाला.  

Updated: Aug 30, 2019, 04:04 PM IST
... आणि शरद पवार यांच्या संतापाचा भडका उडाला title=
संग्रहित छाया

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संतापाचा शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये भडका उडाला. पवारांच्या या संतापाची धग एका पत्रकाराला सहन करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या गळती लागली आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या पाठोपाठ शरद पवारांचे नातेवाईकही भाजपमध्ये प्रवेश करत आहेक, अशा आशयाचा प्रश्न एका पत्रकारानं विचारला. तेव्हा पवार चांगलेच भडकले.

नातेवाईकांचा काय संबंध आहे, असा प्रतिसवाल करत असे विचारणार असाल तर मी पत्रकार परिषदेत बोलणार नाही, अशा शब्दांत पवारांनी पत्रकारालाच चांगलेच धारेवर धरले.आम्ही कुठेही कमी पडलेलो नाहीत. ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे.  जे जात आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी पुस्तीही पवारांनी यावेळी जोडली. मात्र, पवारांच्या संतापाची जोरदार चर्चा आहे.