'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे'

 पेट्रोल दरवाढ, नोटबंदी, बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तीन वर्षातचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र विचारायची वेळ आली आहे. 

Updated: Sep 23, 2017, 11:30 PM IST
'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे' title=

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल दरवाढ, नोटबंदी, बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तीन वर्षातचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र विचारायची वेळ आली आहे. 

जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे, आम्ही यावर समविचारी पक्षांशी चर्चा करू असं त्यांनी सांगितलं. तर नारायण राणेंवर त्यांनी तोंडसुख घेतलं.

यामुळे  सिंधुदुर्ग परिसतातील लोकांना  राणेंचा निर्णय जनतेला  किती आवडेल?, असा सवाल शरद पवारांनी विचारत पवारांनी सर्वांना बुचकळ्यात टाकलं.