Sharad Pawar : शरद पवारांच्या कुटुंबाचा असा आहे गोतावळा, घराण्यात नेमके किती सदस्य?

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र या घोषणेनंतर पवारांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 2, 2023, 03:38 PM IST
Sharad Pawar : शरद पवारांच्या कुटुंबाचा असा आहे गोतावळा, घराण्यात नेमके किती सदस्य?  title=

Sharad Pawar Family Tree: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवारचे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. पवारांच्या कुटुंबात नेमके किती सदस्य आहेत आणि ते सध्या काय करतायत याबाबत अनेकांना उत्सुकता असेल. (Sharad Pawar Family Tree)

शरद पवारांचे राजकारण काँग्रेसमधून सुरू झाले असले तरी त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या शेकापमध्ये होत्या. त्या तत्कालीन लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. आईच्या संस्कारांमुळे पवार कुटुंब सुरुवातीपासूनच सत्यशोधक आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली राहिले. शरद पवार यांनी एकूण चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या... पवार हे महाराष्ट्र राज्याचे माजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. 

तिसरे शरद पवार ...

गोविंद पवार आणि शारदाबाई यांना एकूण पाच मुलं होते. त्यात थोरले आप्पासाहेब, दुसरे अनंतराव तिसरे शरद पवार, चौथे प्रतापराव आणि पाचवी मुलगी सरोजताई होते. अजित पवार हे अनंतरावाचे चिरंजीव तर सुप्रियाताई या शरद पवारांच्या कन्या...

सुप्रिया सुळे यांची एन्ट्री

राजकारणी म्हणून खरतर पवार यांच्या पहिल्या पिढीतील शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या कुटुंबात विसंवाद निर्माण केला नाही. फक्त दुसऱ्या पिढीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया यांच्यासोबत अजित पवार यांनीही राजकारणात प्रवेश केला. पण त्याच तारखेला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे दिल्लीत तर अजित पवार यांना राज्यात अशी राजकीय वाटणी करु दिली. 

वाचा : शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?

रोहित पवार कोणाचे पुत्र? 

तिसरी पिढी युवराज रोहित हे आप्पासाहेबांचे नातू म्हणजेच अजित पवारांचा पुतण्या आहे. अजित पवार यांना पार्थ आणि जय ही दोन मुले आहेत. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास हे ऑटोमोबाईल व्यवसायात आहेत आणि प्रतापवारांचे यांचे चिरंजीव अभिजीत हे सकाळ मीडिया हाऊस चालवतात. सुरुवातीला अजितदादांच्या बहिण विजया पाटील या पण अगदी सकाळच व्यवस्था पाहत होत्या, पण नंतर त्या तिथूम बाहेर पडल्या. त्यानंतर रोहितचे वडिल राजेंद्र यांनी शेती व्यवसायात झोकून दिले. पण त्यांचा मुलगा रोहित पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला.