पुणे : पुणेरी पगडी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क पुणे महापापालिकेच्या इमारत उदघाटनाच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आलं. त्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी तसा ठरावच केल्याचं कळतय. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र पुणेरी पगडी घालायला लागू नये म्हणून पवारांनी दांडी मारल्याची चर्चा आहे. तर पवार अनुपस्थित राहल्यानं भाजपचीही पवारांना पुणेरी पगडी घालण्याची संधी हुकली आहे.
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर तसेच जाहिरातींमधे राष्ट्रवादीच्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात आलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला होता.