Sharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...

Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

Updated: Jun 10, 2023, 06:07 PM IST
Sharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले... title=
ajit pawar Sharad Pawar NCP Executive President

Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज भाकरी फिरवील. राष्ट्रवादीचा (NCP) आज 25 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने भाषण करत असताना शरद पवार यांनी पक्षाची सुत्र प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हाती दिली आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची (NCP Executive President) जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्नाचा झांगडगुत्ता तयार झालाय. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा असताना शरद पवार यांनी अजितदादांच्या नाराजीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढचा पक्षाध्यक्ष कोण?

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी पुढील पक्षाध्यक्ष कोण असेल यावर आपलं मत मांडलं. सध्या पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही. जेव्हा जागा खाली होईल तेव्हा बघू, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार नाराज?

अजित पवार नाराज असल्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. जयंत पाटील आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार सध्या विरोधीपक्षनेते आहेत. अजित पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावर आधीच मोठी जबाबदारी आहे, असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. अजित पवार नाराज नाहीत, असं शरद पवार (Sharad Pawar On Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा - प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, लोकांची इच्छा होती प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी द्यावी. माझा राजीनामा पक्षातील कार्यकर्त्यांनी मंजूर केला नाही. त्यामुळे आता माझं लक्ष प्रचार आणि आक्रमक प्रचार असेल. राष्ट्रीय अध्यक्ष पद रिकामं झाल्यावर नवीन अध्यक्षांचा विचार करू. लोकसभेत सुप्रिया सुळे अनुभवी आहेत. त्या चांगलं काम करतील, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केलाय.