पुण्यात शरद पवार - नितीन गडकरींची भेट

Updated: Jun 1, 2018, 06:30 PM IST

 मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातल्या जे डब्ल्यू मॅरिऑट हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत नागपूर मेट्रो आणि पालखी मार्गाच्या कामासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. तसंच ही भेट गुप्त वगैरे काही नसल्याचंही पुढे आलं आहे. 

या अगोदर देखील नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. तेव्हा देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं दोघांकडून स्पष्ट झालं आहे.