शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून राज्याचा दौरा करणार आहेत. 

Updated: Oct 8, 2019, 12:49 PM IST
शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार title=
संग्रहित छाया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून राज्याच्या झंझावाती दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार महाराष्ट्र पुन्हा एकदा पिंजून काढणार आहेत. शरद पवार यांनी पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा दौरा केला. 

शरद पवारांची खास मुलाखत पाहा

आता दुसऱ्या टप्प्यात ते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी पवारांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पवार यांनी काही भागात अनेक भागात सभा घेतल्या. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पवार सरकारवर तोफ डागण्यासाठी सज्ज झालेत. 

दरम्यान, शरद पवारांनी काल 'झी २४ तास'शी बोलना स्पष्ट केले. राज्यात बदलाचे वारे दिसून येत आहे. तरुण पुढे येत आहे. मी तरुणांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यात तरुणांची नवी फळी उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार आहे.