मुंबई - पुणे महामार्गावर सात दिवस ब्लॉक

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: May 15, 2019, 06:40 PM IST
मुंबई - पुणे महामार्गावर सात दिवस ब्लॉक title=

रायगड : तुम्ही मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवास करत असणार असाल तर तुमच्यासाठी ही ही महत्वाची बातमी आहे. या मार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुबंई - पुणे एक्सप्रेस वेवर दरडी हटविण्यासाठी ब्लॉक पावसाळ्यापूर्वीची तयारी दर तासाला १५ मिनिटाचा ब्लॉक असणार आहे. खंडाळा घाटात आडोशी बोगद्या जवळ दरडी पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असून दोन्ही मार्ग या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे.

तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणार्‍या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १५ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान हा ब्लॉक असेल. 

या ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत  दरतासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण सहा ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

१७ मे पर्यंत काम सुरू राहणार असून तोपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तसेच दि. २१ मे ते २३ मे पर्यंत मेगा ब्लाँक असणार आहे.

सकाळी पहिला १० ते १०.१५ वाजता

दुसरा ११.४५ ते.१२.०० वाजता

दुपारी तिसरा १२.४५ ते १.०० वाजता

चौथा   २.०० ते २.१५ वाजता

पाचवा ३.०० ते ३.१५ वाजता

सहावा ४.०० ते ४.१५ वाजता