Section 144 In Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे असून शहरात आजपासून 144 कलम लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसंच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत शहरात 144 कलम लागू असणार आहे. शहरातील बार, रेस्टॉरंट, पब आणि रूफटॉप रेस्टॉरंटसाठी या आस्थापनांसाठी हे आदेश जारी करण्यात आला आहे. (Section 144 applicable from today in pune city till march 31 What is the reason maharashtra news in marathi) या आस्थापनांना त्यांचे कामकाज पहाटे 1.30 वाजेपर्यंतच करता येणार आहे. शिवाय वेळेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच ड्रग्जचे मोठे रॅकेट समोर आल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांसाठी कलम 144 अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2024 ला पोलीस आयुक्तांनी 15 दिवसांसाठी हा आदेश दिला होता. त्याची मुदत 4 मार्चपर्यंत होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे शहरात कायदे, न्यायालयीन आदेशांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आले. नवीन आदेशानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कलम 144 लागू राहणार आहेत. या काळात शहरातील इमारतींच्या टेरेसवरील अनधिकृत पब्स, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद केले जात आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल 4 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलंय.
छतावरील आस्थापनांना अल्कोहोल देण्यासाठी विशिष्ट परवाना आवश्यक आहे. तो नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वयोमर्यादा इत्यादीसह अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबत अबकारी परवाना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या आस्थापनांमध्ये लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या परदेशी नागरिकांची 15 दिवस अगोदर सूचना देणे अनिवार्य असणार आहे. तिकीट परफॉर्मन्ससाठी पोलीस आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. प्रवेश, बाहेर पडणे आणि सेवा देणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार आहे. तसंच डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरचे दोन संच गरजेचे आहे. इनडोअर म्युझिक परफॉर्मन्स पहाटे 1.30 पर्यंत असेल. आउटडोअर परफॉर्मन्स आणि इव्हेंट्स रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे.