स्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटून अपघात, 5 जणांचा मृत्यू

तुळजापूरवरून येताना झाला अपघात

स्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटून अपघात, 5 जणांचा मृत्यू  title=

मुंबई : इंदापूर येथे स्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटून अपघात झाला आहे. अपघातात स्कॉर्पिओतील 5 जाणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 2 पुरूष, 2 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून अपघाताची तीव्रता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

स्कॉर्पिओतील सर्व प्रवाशी हे तुळजापूरचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास केला जात आहे.