दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय

काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Updated: Nov 10, 2022, 04:23 PM IST
दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळा (School) पुन्हा सुरु झाल्यायत.शाळेच्या पहिल्याच दिवशी जालन्यातील नळविहीरा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत कोब्रा हा विषारी नाग आढळून आल्यानं खळबळ उडाली.वर्गखोलीतील फरशीच्या मोकळ्या जागेत हा साप फणी (Snake Videos) काढून बसलेला होता.वर्गखोलीत साप आढळून येताच शिक्षकांनी सावध पवित्रा घेत सर्पमित्राला बोलावलं.काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. (School started after Diwali vacation cobra snake was found in the classroom on the first day of school)

सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण...

पंकजने यापूर्वी साप पकडले आहे. पण तो प्रशिक्षित सर्पमित्र नाही. त्याला सापाची ओळख किंवा सापांचा विषारी प्रजातीबद्दल फारसं माहीत नाही. त्यामुळं पंकजनं या कठीण प्रसंगात भिऊन न जाता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सोपं ठराव म्हणून साप सोबत घेऊन रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. पंकजने सापानं दंश केल्यानंतर त्याच तोंड पकडून हातात धरून तो रुग्णवाहिकेत पोहचला. दरम्यान तो रुग्णवाहिकेत हातातील साप (snake video) सुटला असता तर आणखी धोकादायक झालं असतं. पण नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात पोहचला. डॉक्टर आणि परिचारिका याना साप दिसताच अजूनच घाबरून गेलेत. रुग्णालयात काही वेळ एकच खळबळ उडाली. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

उपचार महत्त्वाचे : 

उपस्थितीत डॉक्टरानी त्या सापाला प्रसंगावधान राखत प्लास्टिक पिशवीत ठेवून ती पिशवी बांधण्यास सांगितलं आणि पंकजवर उपचार सुरु केलेत. तसेच सर्पमित्राला पाचारण केलेत. तेच पंकजवर विविध तपासणी नंतर मेयोत त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर होत असल्याचं सांगितलं जातं आहे. या सापाला जंगलात परत सोडलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अधिकृत सर्पमित्र असलेल्या नितीन भांदक्कर (snake viral news today) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या सापाला स्टिकच्या साह्याने एका प्लस्टिक पेटीत बंद करून रसल वायपरला जंगल अधिवासात सोडले. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

माहिती नसणं जीवावर बेतू शकतं : 

यात ज्यांना सापांबद्दल फारशी माहिती नाही त्यानी सापाला हाताळण्याची चूक करू नये. कारण बरेचदा विषारी साप असतात. त्याची ओळख नसल्यानं त्या सापानी चावा घेतल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे उगाच धाडस करणं खेळ करणं चुकीचं असल्याचं भांदक्कर सांगतो.